समानतेचा सूर्य उगवला दिशा दाखवायासमानतेचा सूर्य उगवला दिशा दाखवाया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
कंकरात हा हीरा घावला,
मानवतेचा झेंडा लावला…
उभा ठाकला हीनदीनांचे दुःख निवाराया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
चिखलामध्ये हे कमळ फुलले,
तिथे जगाचे चित्त लागले…
हा दुबळ्यांचा झाला राजा दीना उद्धाराया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
मंत्र दिधला संघर्षाचा,
पल्ला गाठाया उत्कर्षाचा…
अवनीवरच्या अवनीतीच्या असूरा माराया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
दामोदरा ह्या कोटी जीवांचे
दिवस आले वैभवाचे…
माता होऊन घास पिल्लांना आला चाराया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
समानतेचा सूर्य उगवला दिशा दाखवाया…
अहो माझा भीमराया आला जगाला ताराया…
गायक :- आनंद शिंदे..