तु रमा song Lyrics Marathi ramai song

रमाबाईचे निधनसमयी (२७ मे १९३५ रोजी) राजगृह दादर येथे शोकमग्न बाबासाहेब आंबेडकर व भैय्यासाहेब (यशवंतराव) खाली बसलेले..रमाईंचा खुर्चीवर असलेला मृतदेह पाहून बाबासाहेब म्हणतात…

जीवनात पैज ना कधी हरलीस तु रमा..
आदर्श माऊल्यांप्रती ठरलीस तु रमा…

उदंड प्रेम आईचे देऊन समाजा..
कीर्तीरुपाने या जगी उरलीस तु रमा…

जीवनात धन्य झालो मी रमा तुझ्यामुळे..
तुडवीत काटे आलो मी रमा तुझ्यामुळे…

अर्ध्यात गेली सोडुन झालो मी पोरका..
विरहात आज न्हाहलो मी रमा तुझ्यामुळे…

मनाला सोडुनी हे नाते तोडुनी
गेली का सोडुनी तु रमा…

केला कसा काळाने घात
आणि अर्ध्यातच सुटला साथ..
भासू दिली ना कमी कशाची
मजला आयुष्यात..
स्वतः धडपडली गं कधी ना रडली गं..
दिव्यासम जळली गं तु रमा…

आधार नाही तु गेल्यापाठी
क्षणातच तुटल्या रेशीमगाठी..
मला वाटते जणू हरवली
आंधळ्याची काठी..
तु दुःख साहिले सुख ना पाहिले
हे तन मन वाहिले तु रमा…

देऊ कसा मी धीर या मनाला
अर्थ ना उरला या जीवनाला..
ह्रदय फाटते येता आठवण
तुझी क्षणाक्षणाला..
शिलाची शिलवान गुणाची गुणवान..
तु माझा जीव प्राण तु रमा…

मनाला तोडुनी हे नाते तोडूनी
गेली का सोडुनी तु रमा…

गायक :- परमानंद भारती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणाय्रा या मातेच्या चरणी कोटी कोटी अभिवादन…..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *