पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स

 पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला.. भीम गीत लिरिक्स समाजधुरिणांना उद्देशून बाबा म्हणाले,
“बघा गड्यांनो, मी समाजाचा रथ इथंवर आणलायं, यापुढं त्याचं सारथ्य तुम्हीच करा. समाजाचा रथ बाबानं सोपवला, बाबांनी प्राण त्यागला. अन् लगेच स्वार्थ टपकला, पुढारी बयकला..
काय सांगू भाऊ तुला
रथ त्यानं सोपविला
चक्का आता निसटला
पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला..
समाजाच्या भल्यासाठी कणकण राबला
प्रकाशाच्या किरणासाठी रातरात जागला
बाबाचे रे हिस्से केले वाटणीत गुंग झाले
समाज भटकला समाज भटकला
पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला..

खूर्ची त्यानं दिली तुला गाडी त्यानं दिली तुला
माणसाची माणूसकी शिकविली त्यानं तुला
स्वतःच्या रे स्वार्थापायी बापुळ्यांचं वाटोळं रे
भीमाला विसरला भीमाला विसरला
पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला..

नाही आता चालणार तुझा असा डाव गड्या
समाजाच्या विकासाचं घे आता नाव गड्या
त्याग जर तु केला नाही आग बघ मग विझणार नाही
भीमाचा पेटला भीमाचा पेटला
पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला..

काय सांगू भाऊ तुला
रथ त्यानं सोपविला
चक्का आता निसटला
पुढारी बयकला रे आमचा पुढारी बयकला..

गायक :- रमेश थेटे..

Dr.Bhimrao Ramji Ambedkar

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *