झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स

 झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…भीम गीत लिरिक्स 

भीमामुळं गेलं खुळं अंध रुढीचं…..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं..

माया माती काल ती पिकाया लागली..
पोरं सोरं आज ती शिकाया लागली..
गेलं सारं दारिद्रय काळ्या कुळीचं..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

भीमशक्ती अंगामधी आली तरारी..
फुटले पंख पाखरांना घेती भरारी..
मिळालं हो शिक्षण हे उंच ओळीचं..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

जगती सारे भीमामुळं स्वाभिमानानं..
दानं दिलं दलितांना मोठ्या श्रमानं..
तोडलं जातीचं टाळं नीच बेडीचं..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

गुणगान गाती गोड रमा पतीचं…..
कष्ट पाहुन भीमाच्या सौभाग्यवतीचं..
पाय धराया मनापासून दोहींच….
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

रंगराजा भेटली तुला ही देणगी…..
झाली तुझी बुद्धविहारी रवाणगी..
तुझ्या झोपडीला रुप आलं माडीचं..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

भीमामुळं गेलं खुळं अंध रुढीचं…..
झालं सोनं झालं माझ्या भावी पीढीचं…

गायक :- प्रकाश पाटणकर..

डॉ भीमराव रामजी आंबेडकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *