बुद्धीच्या किनाय्रावर विश्व तु चकीत केले.. Bhimsong Lyrics Sung By आनंद शिंदे

बुद्धीच्या किनाय्रावर विश्व तु चकीत केले..

बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते
समतेच्या भावनेतील चंदन भीमात होते..

तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते..

संकल्प या मनाचा क्रांती करुन गेला
निधड्या मनाचा मोठा होऊन सिँह गेला..

दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने
इतिहास घडविला माझ्या युगंधराने..

ती आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची..

दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा..

विसरुन गेला शेवटी जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला माणूस करुन गेला..

Dr. Bhimrao Ambedkar

काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात
तु दाखविली पहाट उज्वल प्रखर ती ज्योत..

न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दीन बांधवांना आदर्श होता..

बंधुत्व न्याय ज्याने ह्रदयात साठविले
दलीतांचे राजकारण दिल्लीला पाठविले…

बुद्धीच्या किनाय्रावर विश्व तु चकीत केले
पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात..

भीमसूर्य क्रांतीचा पाहिला विधानात
बुद्ध ज्याने दाविला पिँपळाच्या पानात…

गायक :- आनंद शिंदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *