भीमरायानं किमया गं केली माळरानाची फुलबाग झाली.. Bhimgeeet Marathi Lyrics From उत्तरा केळकरDr.

भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली  मराठी लिरिक्स  भीमगीत….

काळ्या मातीत सपानं हिरवं भीमानं सजवलं..
वेठकरबिगारं बलुतेदाराला शिकवूनं जागवलं..
शिका शिका रं एकीन राहा रं वाघावानीया जगा
हो दिशा अशी दाखवली..
भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली..

पालापाचोळा जगणं आमचं भीमानं सुधारलं..
उजळून टाकलं काट्यातलं जग जे होतं अंधारलं..
गुलामगिरीला सुरुंग लावला हक्काला जगवलं
हो झाला दलितांचा वाली..
भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली..

आता आभाळं झालंया मोकळं आनंद मनोमनी..
भीतीनं दडली झाडीत पाखरं उडाली रानीवनी..
पंखात भरलं समतेचं वारं सुखानं झेपावली
हो निळ्या निळ्या नभाखाली..
भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली..

भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली..
वाळलेली रानमाती त्याच्या ग्यानानं ओली झाली
नवी पालवी सुखानं न्हाली..
भीमरायानं किमया गं केली
माळरानाची फुलबाग झाली..

गायिका :- उत्तरा केळकर..

डॉ भीमराव रामजी आंबेडकर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *