ओवाळीते मी भीमरायाला Bhim geet Marathi Lyrics

ओवाळीते मी भीमरायालाओवाळीते मी भीमरायाला
आनंद गं माझ्या मनाला..
दवबिंदु वदले बकुळ फुलाला
दारात माझ्या वसंत आला..

बीजांकुरातून वटवृक्ष झाला
मायमाऊलीचा कल्पवृक्ष न्यारा
जयघोष करुया एक मुखाने
आतुर झाल्या त्या पुष्पमाला
ओवाळीते मी भीमरायाला
आनंद गं माझ्या मनाला..

सामर्थ्य त्याचे भी रे जीवाला
दीन बांधवास्तव प्राण पणाला
चंदन होऊन दिन रात झिजला
अंधार रात्री निशीगंध फुलला
ओवाळीते मी भीमरायाला
आनंद गं माझ्या मनाला..

नसते जर बाई छत्र भीमाचे
घडलेच नसते जीवन आमचे
कसे गं फेडु ऋण तयाचे
त्रिवार करते वंदन तयाला
ओवाळीते मी भीमरायाला
आनंद गं माझ्या मनाला..

ओवाळीते मी भीमरायाला
आनंद गं माझ्या मनाला..
दवबिंदु वदले बकुळ फुलाला
दारात माझ्या वसंत आला..

गायिका :- अनुराधा पौंडवाल..

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *