भट बामण पाहुन बावरला … लिरिक्स bhim geet lyrics vitthal umap bhim geet

भट बामण पाहुन बावरला। … लिरिक्स

सुटाबुटामंदी भीम वावरला दादा वावरला..
भट बामण पाहुन बावरला..
भट बामण पाहुन बावरला..


गोलमेज परिषद भरल्यावरी
बाजू दलितांची मांडली खरी..
माझ्या लोकांवर जुलूम जबरी
काय कामाचं सरकार तरी..
त्यो मेळा सवर्णाचा हादरला दादा हादरला..
भट बामण पाहुन बावरला..
भट बामण पाहुन बावरला..


आले आंबेडकर परदेशातून
सभा ती भरली होती खचून..
भीमराव शांत होते बसून
केले रमाईने भाषण ठासून..
हं बघा सहस्रबुद्धे ही बावरला दादा बावरला..
भट बामण पाहुन बावरला..
भट बामण पाहुन बावरला..


सनातन्यांचा झाला विचार
आंबेडरांना मारुया ठार..
रक्ताच्या थेंबा थेँबामधून
लाखो आंबेडकर येतील त्यातून..
कुर्त कोटीनं जत्था आवरला दादा आवरला..
भट बामण पाहुन बावरला..
भट बामण पाहुन बावरला..


सुटाबुटामंदी भीम वावरला दादा वावरला..
भट बामण पाहुन बावरला..
भट बामण पाहुन बावरला..

गायक :- विठ्ठल उमप..

Dr. Bhimrao Ramji Ambedkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *